न्यु कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय करजखेडा या महाविद्यालयात संविधान दिन व २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन साजरा
करजखेडा : न्यू कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय, करजखेडा येथे आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन व २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब अणदुरकर सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुल मॉडर्न इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रा.पैगंबर शेख सर, श्री . गायकवाड बलभीम सर, श्री. शहाजीलाल तांबोळी व पालक बेलकुंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोकांडे सर यांनी केले. यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मूलभूत मूल्ये तसेच नागरिकांची कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बलभीम गायकवाड सर, ओव्हाळ सर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब अणदुरकर सर आणि प्रमुख पाहुणे पैगंबर शेख सर यांनी संविधानाचे महत्त्व व २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या बलिदानाविषयी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, जवान व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षक प्रा. ओव्हाळ सर, प्रा. सोकांडे सर,प्रा. ढमाले सर, श्री.गायकवाड अनुरथ, श्री.भोसले महादेव तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सोकांडे सर यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा