लातूर फार्मसीत संविधान दिन उत्साहात साजरा

 लातूर फार्मसीत संविधान दिन उत्साहात साजरा

 लातूर - श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर मध्ये भारतीय  संविधानाच्या मूल्याची जनजागृती व्हावी यासाठी हर घर संविधान अभियान मोहीम राबविण्यात आलेले आहे. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच देशाचे भावीनागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील महाविद्यालय शैक्षणिक संकुलात जनजागृती केली आहे. तसेच महाविद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे, संचालिका डॉ माधुरी  बावगे, उपप्राचार्या भाग्यश्री धोत्रे,  प्रा भागवत सोमवंशी, प्रा अमित राजूरकर, प्रा अल्ताफ शेख, प्रा नम्रता शिवणकर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून संविधानाचे वाचन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने