महात्मा बसवेश्‍वरांचे विचार पोहचविण्याचे कार्य जगतगुरूनी केले- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महात्मा बसवेश्‍वरांचे विचार पोहचविण्याचे कार्य जगतगुरूनी केले
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर-महान समाजसुधारक, परिवर्तनवादी महात्मा बसवेश्‍वरांनी 12 व्या शतकामध्ये जातीभेद, धर्मभेद व लिंग भेदाच्या विरूध्द परिवर्तन घडविण्याचे क्रांतीकारी कार्य केले. यासाठी त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना करून देशातील पहिल्या पार्लमेंट  “अनुभव मंडपाची ” स्थापना केली. त्याद्वारे चुकीच्या रूढीपंरेविरूध्द  निर्णय घेऊन स्त्रीयांना सन्मान व अधिकार दिले. चांभार व ब्राम्हण मुलांमुलींचे लग्न लावून देवून समाजाला नवीन दिशा देण्याचे क्रांतीकारी कार्य केले. या मानवतावादी, सत्यवादी महात्मा बसवेश्‍वरांच्या मुल्य व विचाराची पताका देशात व जगात पोहचविण्याचे कार्य श्री श्री श्री 1008 जगत्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी करीत आहेत. असे प्रभावी विचार भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते बी-1 एमआयडीसी (1 नंबर) कॉर्नर,लातूर येेथे बसवण्णप्पा पाटणकर व सरोजिनी बसवण्णप्पा पाटणकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ष.ब्र.श्री.108 श्री. शांतीवीरलिंग शिवाचार्य, राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री संजयजी बनसोडे, आ.राजेश्‍वर पाटील, आ.चंद्रशेखर पाटील, अ‍ॅड.व्यंकटराव बेद्रे, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, शिवाप्पा पाटणकर, मंगेश पाटणकर, कमलेश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, भारत देशात आश्रम व्यवस्थेच्या माध्यमातून वेदाच्या विचारावरती आधारीत जाती, धर्म, पंथ विरहीत मानवता, सदाचारी पुरूषार्थी तरूण घडविण्यात आले. राजकुमार राम पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात गेले व दुष्टाचा नाश करून मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र झाले. मानवाचा मूळ आधार अध्यात्म आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात मानवाच्या अंतकरणात त्रिलोकाचे ज्ञान भरले आहे. त्याला अध्यात्माच्या, विद्येच्या माध्यमातून जागृत करा. देशातील यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी निधर्मीपणाच्या नावावर अध्यात्माचे विचार बाजूला ठेवले. यामुळे देशाची व युवा पिढीची हाणी झालेली आहे. त्यामुळे अध्यात्माचा विचार तो भगवत्गिता, कुराण, बायबलमध्ये असल्यास त्याचा स्वीकार करण्याचे ऐतिहासिक कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतील असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने