इन्स्पायर अवार्ड व विज्ञान प्रदर्शन जिल्हा समन्वयक पदी शिवलिंग नागापुरे

इन्स्पायर अवार्ड  व विज्ञान प्रदर्शन जिल्हा समन्वयक पदी शिवलिंग नागापुरे 







औसा प्रतिनिधी-  औसा तालुक्यातील कन्या प्रशाला भादा येथील राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिक विज्ञान  शिक्षक श्री शिवलिंग नागापुरे यांची ईंस्पायर अवार्डस मानक योजना व विज्ञान प्रदर्शन लातूर जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती झाली आहे.संचालक राज्य विज्ञान व प्रशिक्षण संस्था, रवि नगर नागपूर यांच्या संदर्भिय पत्रानवये , लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  मापारी यांनी शिवलिंग नागापुरे यांची जिल्हा समन्वयक पदी निवड केल्याचे कळविले आहे.
 केंद्रशासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे आकर्षित करून विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये संशोधन विकासास चालना देण्यासाठी इन्स्पायर अवार्ड या कार्यक्रमाची सुरुवात केली असुन या योजनेची यशस्वीरित्या ही राष्ट्रविकासात योगदान देणारी ठरणार आहे. या योजनेबद्दल नागापुरे यांना ज्ञात असून या योजनेबद्दलची त्यांची आवड आणि  या योजनेत त्यांनी यापूर्वी केलेले काम विचारात घेवून लातूर जिल्ह्यात या योजनेची अधिक यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी इन्स्पायर अवार्ड मानक योजना व विज्ञान प्रदर्शनाचे लातूर जिल्हा समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आह असे पत्रात नमूद केले आहे.लातूर जिल्ह्यात ईंस्पायर अवार्डस योजनेत जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी नोंदनी करण्यासाठी प्रयत्न करावेत, शिक्षक  विद्यार्थ्याना या योजनेत येणाऱ्या समस्येबाबत मार्गदर्शन करावे असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे.
शिवलिंग नागापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या विविध स्पर्धेत राज्य स्तरापर्यंत अनेकवेळा सहभाग घेवून यश संपादन केले आहे. विज्ञान प्रदर्शन , आणि विषयाच्या विविध स्पर्धेचे परिक्षक म्हणूनही नागापुरे यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. यापूर्वीही त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत.
या निवडी बद्दल शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, गटशिक्षणाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सर्व सदस्य,शिक्षक, विद्यार्थी पालक व मित्रपरिवारांनी या निवडीबद्दल शिवलिंग नागापुरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने