रोटरॅक्ट वाचन कट्ट्यातून वाचन संस्कृती जोपासण्यास मदतच होईल- वैशालीताई देशमुख
लातूर :-- रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मीड टाऊन व रीड लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या "रोटरॅक्ट वाचन कट्ट्यातून" अनेकांना दर्जेदार पुस्तके वाचण्यासाठी मिळणार असून यातून वाचन संस्कृती जोपासण्यास मदतच होईल असा विश्वास विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी व्यक्त केला.आदर्श कॉलनी येथील ग्रीन बेल्ट मध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ मीड टाऊन लातूर व रीड लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने व विद्यानंद संस्कृत क्लासेस यांच्या सहकार्याने रोटरॅक्ट वाचन कट्टा या नावाने ओपन बुक लायब्ररीचा शुभारंभ वैशालीताई विलासराव देशमुख, चित्रपट निर्मात्या व रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ.दीपशीखाताई धिरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमुंडे, जिल्हा बँक संचालिका सपनाताई किसवे, बसवराज उटगे,अंकिता बिरनाळे (अध्यक्ष रोटरॅक्ट क्लब ऑफ मीड टाऊन),शौनक दुरुगकर(सचिव),सृष्टी बिदादा,रमण तिवारी(प्रकल्प अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती.
जे जे नवे ते लातूरला हवे या उक्तीप्रमाणे नाविन्यपूर्ण असा वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे. यातून लातूरची वेगळी ओळख अधोरेखित करणारे कार्य नावारूपास येईल असा विश्वास यावेळी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी व्यक्त करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, रमण तिवारी, प्रतीक वारद,रीड लातूरचे समन्वयक राजू सी पाटील यांनी आपल्या मनोगतातून वाचन संस्कृती संबंधी व उपक्रमा विषयी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास अविष्कार गोजमुंडे,प्रसाद वारद,भक्ती गोजमगुंडे, अजिंक्य निकम, ओमकार बिरनाळे, रवी भुतडा, निखिल कुलकर्णी, प्रतीक वारद सुमित घुमने,चैतन्य मालू, रीड लातूर टीमचे सदस्य रावसाहेब भामरे, केशव गंभीरे,विजय माळाळे, विजयकुमार कोळी,श्रीमती रंजना चव्हाण, सुरेश सुडे, यांच्या सह रोटरॅक्ट क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा