भाजपाचे प्रा. किरण पाटील यांना लातूर जिल्ह्यातून मोठे समर्थन!

भाजपाचे प्रा. किरण पाटील यांना लातूर जिल्ह्यातून मोठे समर्थन!

        लातूर  - मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी नुकताच दौरा करुन लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. यावेळी कोणत्याही परिस्थितीत बदल करणार असल्याचे ठिकठिकाणी शिक्षक मतदारांनी बोलून दाखवले.

          भाजपाबाळासाहेबांची शिवसेनारिपाई (आ)शिवसंग्रामरयत क्रांती संघटना आणि शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी दोन दिवस लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांना, शाळा, कॉलेजला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराडखा. सुधाकर शृंगारेप्रदेश भाजपाचे विनायकराव पाटीलसुधाकरराव भालेरावअरविंद पाटील निलंगेकरगोविंदअण्णा केंद्रेगणेशदादा हाकेशैलेश लाहोटीगुरुनाथ मग्गेसंजय दोरवेदिलीपराव देशमुखरामचंद्र तिरुकेअशोककाका केंद्रेविक्रमकाका शिंदेबापूराव राठोडराहुल केंद्रेसंतोषअप्पा मुक्ताअमोल पाटीलबस्वराज बागबंदेशिवाजी बैनगिरेहनुमंत देवकतेबस्वराज रोडगेमनोज पुदालेश्रीमती रेखाताई तरडेमीनाताई भोसलेदिग्विजय काथवटेअ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवलेसिद्धेश्वर मामडगे यांच्यासह लातूर शहर आणि ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी भाजपाचे पदाधिकारी प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.

         या दौऱ्यात लातूर शहरातील शाहू कॉलेजदयानंद कॉलेजमहात्मा बसेश्वर कॉलेजकॉक्सिटजयक्रांतीज्ञानेश्वर विद्यालयसरस्वती विद्यालय., चाकूर येथील भाई किशनराव देशमुख विद्यालयविलासराव देशमुख विद्यालयसंजीवनी विद्यालय चापोली.अहमदपूर येथील महात्मा फुलेयशवंत विद्यालयरविंद्रनाथ टागोर विद्यालयमहात्मा गांधी महाविद्यालयकिलबिल विद्यालयउदगीर येथील उदयगिरी कॉलेजशिवाजी महाविद्यालयहावगीराव स्वामी महाविद्यालयश्यामलाल कन्या विद्यालय यासह विविध शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये संस्थाचालक शिक्षक मतदारांनी उमेदवारासह उपस्थित सर्व मान्यवरांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

           प्रत्येक ठिकाणी झालेल्या बैठकीत उपस्थित भाजपाच्या मान्यवर नेते मंडळींनी राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रा. किरण पाटील यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले तर गेल्या पंधरा वर्षात शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेक प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही अशी माहिती देऊन उमेदवार प्रा. किरण पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. येत्या काळात जुन्या पेन्शनसह विविध प्रश्न सोडवणुकीसाठी आपण आपले बहुमोल पहिल्या पसंतीचे मत देऊन मला काम करण्याची आणि आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले.

        शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बदल करण्याचा निर्धार प्रत्येक ठिकाणी शिक्षक मतदारांनी व्यक्त केला यामुळे लातूर शहरासह जिल्हाभरातून प्रा. किरण पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल अशी स्थिती या प्रचार दौर्‍यातून दिसून आली. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने