सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाचा अनोखा उपक्रम

सार्वजनिक बांधकाम विभागजलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाचा अनोखा उपक्रम





लातूर: ‘माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके एवढा अमाप गोडवा असणाऱ्या माय मराठीचे आपण सगळे शिलेदार. सध्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरु आहे. यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रम सुरु आहेत. पण लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागजलसंपदा आणि मृदा व जलसंधारण या तीन विभागांच्यावतीने 26 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रम हे मराठी भाषेची गोडी लावणारेसंवर्धन करणारेलिहिते करणारे होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित या कार्यक्रमांमध्ये अधीक्षक अभियंता ते लीपिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला. शीघ्र कविताप्रसिद्ध साहित्यिकाच्या कथा कादंबरीनाटक याच्या उताऱ्याचे अभिवाचनमराठी शुद्धलेखनवादविवाद स्पर्धामोबाईलचे मनोगत असे एकाहून एक सुंदर कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते.

सगळे कार्यक्रम अत्यंत दर्जेदारभाषेतले सौंदर्य स्थळे याच्यासह अभिनयाचा समावेश असणारे होते. असे निखळ कार्यक्रम भाषेची अभिरुची वाढविणारे ठरतात. या कार्यक्रमांच्या आयोजनाचे श्रेय जातं ते मराठी भाषेतील उत्तम लेखक आणि लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेखदुसरे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंतासाहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक अभिजित म्हेत्रे यांना. या दोन अधिकाऱ्यांमुळे सध्या लातूर विभागातील सर्व अभियंते वाचनाकडे वळतायत हे अत्यंत उत्साहवर्धक चित्र आहे.

मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत सर्व स्पर्धा बांधकाम भवन येथील सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये हस्ताक्षर स्पर्धाशुद्धलेखन स्पर्धानिबंध स्पर्धाकाव्यलेखनयुनिकोड लिपी टंकलेखन स्पर्धाअभिवाचन स्पर्धा‘माझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना’ याबाबत तीन ते पाच मिनिटे बोलणे, ‘शालेय शिक्षण मराठीतून की इंग्रजीतून’ या विषयावर वादविवाद स्पर्धाअंताक्षरी स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने