महादेव मंदीर कलश स्थापना समारोहाचे गुरुवार रोजी आयोजन
अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हनुमान जयंतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
लातूर प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर नगर, रिंग रोड भागातील पंचमुखी हनुमान मंदिर येथील महादेव मंदीरावर ह. भ.प. श्री रामकृष्णाचार्य महाराज हलगरकर, रघुत्तमाचार्य जोशी याच्या हस्ते कलश स्थापना गुरुवार (दि. 30) रोजी करण्यात येणार आहे. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हनुमान जयंती व लक्ष्मण शक्तीचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महादेव मंदीर कलश स्थापना निमित्त गुरुवार दि. 30 ते गुरुवार दि. 6 या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 30 रोजी ह. भ.प. श्री रामकृष्णाचार्य महाराज हलगरकर, रघुत्तमाचार्य जोशी यांच्या हस्ते तर मंदिर पुजारी सुरेश महाराज कोष्टगावकर, रामराव आनंदराव कुलकणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव मंदीर कलश स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी ह. भ.प. श्री धनराज महाराज डोंगरवांवकर यांचे ज्ञानेश्वरी पारायण व ह. भ.प. श्री नरसिंह गोविंदराव गोणे यांचे विष्णु सहस्त्रनाम पठन करण्यात येणार आहे.
महादेव मंदीर कलश स्थापना निमित्त गुरुवार दि. 30 ते गुरुवार दि. 6 या दरम्यान विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश आण्णाराव कवठाळकर, सचिव पप्पू (प्रसाद) कुलकर्णी कोषाध्यक्ष दिलीप दाजीबा पाटील तसेच सर्व संचालक मंडळ व संत ज्ञानेश्वर नगरातील समस्त नागरीकांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा