‘मारुती महाराज’ कडून २ लाख पोत्यांचे उत्पादन

 औसा/प्रतिनिधी-कमी कालावधीत योग्य नियोजन केल्याने श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात १ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करुन २ लाख ८१ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले असून परिवारातील सर्व साखर कारखान्यांनी आजतागायत ४५ लाख विक्रमी मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. येणा-या काळात संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना अधिकाधिक गाळप करेल. यासाठी जी मदत लागेल त्यासाठी जिल्हा बँक खंबीरपणे उभी राहील, असे मत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या २०२२- २३ च्या गाळप हंगामात १ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उत्पादित झालेल्या २ लाख ८१ हजार साखर पोत्यांचे पूजन प्रसंगी ते बोलत होते दिलीपराव देशमुख म्हणाले की, कारखान्याने कमी कालावधीत योग्य नियोजन करून गाळप चांगले करण्याबरोबरच चांगलीं रिकव्हरी आली आहे. यासाठी ऊस उत्पादक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगारी कौतुकास्पद आहे. चालू हंगामातील काही अडचणी असतील तर त्या हंगाम संपल्यावर दूर करून घेण्यात येतील. आगामी हंगामात अधिक गाळप करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येणा-या काळात मारुती महाराज साखर कारखाना अधिकचे गाळप करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयंिसंह देशमुख, सचिन दाताळ, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक विलास शिंंदे, सुरेश भुरे, अनिल झिरमिरे, हरिश्चद्र यादव, शामराव साळुंखे, सचिन पाटील, सुरेश पवार, हणमंत माळी, गितेश शिंदे प्रदीप चव्हाण, स्रेहल जगताप , अर्चना भोसले, प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे हे उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सूळ, शेतकरी संघटनेचे नेते राजेन्द्र मोरे, छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे, मांजरा साखर कारखान्याचे संचालक धनराज दाताळ, संचालक महेंद्र भादेकर, संचालक बोळंगे, अँड बाबासाहेब गायकवाड, सतीश पाटील, राजीव कसबे, शिवाजी कांबळे, शशिकांत देशमुख, बाळासाहेब जाधव, उसउत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने