औसा मतदारसंघात वीर सावरकर ४व५एप्रिल यात्राआ.अभिमन्यू पवार

औसा  मतदारसंघात वीर सावरकर ४व५एप्रिल   यात्रा
आ.अभिमन्यू पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती..



औसा/प्रतिनिधी – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी, जाज्वल्य राष्ट्रवादाचा विचार घरोघरी पोहचण्यासाठी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात वीर सावरकर गौरव यात्रा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून औसा मतदारसंघात औसा येथे दि.४ एप्रिल रोजी तर ५ एप्रिलला मतदारसंघातील कासारसिरसी मंडळात हि गौरव यात्रा काढली जाणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि.३१) रोजी औसा येथील पत्रकार परिषदेत दिली.
            यावेळी पत्रकार परिषदेत आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की कारण नसताना राहूल गांधी वीर सावरकर यांच्याबद्दल सातत्याने अवमानकारक व्यक्तव करित असून स्वातंत्र्य लढय़ात वीर सावरकर यांचे योगदान मोठे आहे.याबाबत राहूल गांधीना कोणीतरी चुकीच माहिती देतात आणि राहूल गांधी ती माहिती वाचून दाखवतात राहूल गांधी च्या आजी इंदिरा गांधी काँग्रेस चे दिवंगत पंतप्रधान पी व्हि नरसिंह राव, दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आदी मंडळींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आदराची भावना व त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पत्रातील शेवटच्या दोन ओळीतील मजकूराचा चुकीचा अर्थ लावून राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत शंका निर्माण करीत असतात स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी विचाराचे होते. शिवाय त्या काळात अस्पृश्यांसाठी पाचशे मंदिरे दर्शनासाठी खुली केली. हे सुधारणावादी विचाराचे होते. दोनवेळा काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली त्या काळात तुरुंगात त्यांनी केलेल्या कविता जनमानसात प्रभाव करुन आहेत.
                यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा भीमाशंकर राचट्टे,बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गणेश माडजे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंकट पाटील, शहर कार्याध्यक्ष धनराज परसणे, भाजप महिला प्रदेश सचिव कल्पना डांंगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन आनसरवाडे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी, जाज्वल्य राष्ट्रवादाचा विचार घरोघरी पोहचण्यासाठी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात वीर सावरकर गौरव यात्रा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून औसा मतदारसंघात औसा येथे दि.४ एप्रिल रोजी तर ५ एप्रिलला मतदारसंघातील कासारसिरसी मंडळात हि गौरव यात्रा रथ जाणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने