जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकरांच्याहस्ते
स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलमधील गुणवंताचा सत्कारलातूर दि.07-04-2023
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षामध्ये विविध परीक्षेमध्ये यश संपादन केले. त्याबद्दल जेएसपीएम संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष विरेंद्र पंडीपुले, अमोल डांगे, पवन मालपाणी, किशन कुलेरिया, प्रशांत कावडे, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, उपप्राचार्य आशा जोशी, पी.टी.ए.पालक सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्व्यक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव आदींच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेमध्ये सात विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली. रोटरी क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले. तसेच यातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांला सायकल भेट देण्यात आली याबरोबरच बाल दिनाचे औचित्य साधून संत तुकाराम स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेतील प्रथम आलेल्या स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्याला 11 हजाराचे पारितोषिक मिळाले. ऑलंम्पियाड स्पर्धा परीक्षेत सायन्स व इंग्लिश या दोन विषयात 28 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले. या सर्व विजेत्यांना जेएसपीएम संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष विरेंद्र पंडीतुले यांच्यास्ते सन्मानीत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च विद्या विभूषित, सुसंस्कृत व्हावे तसेच उज्ज्वल सुसंस्कृत भारताचे नागरिक व्हावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रामाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता ओव्हळ व शिवकन्या तट यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ.आशा जोशी यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा