लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जिप शाळेच्या ६६ कामासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७५ लक्ष रूपयाचा निधी
लातूर दि.०७- जिल्हा वार्षीक योजना २०२२-२३ अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या ६६ विविध कामासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७५ लक्ष २४ हजार रूपये निधी नुकताच मंजूर झाला आहे.
लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था निर्माण झाली असल्याने या शाळांची दुरूस्ती व्हावी, प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह व्हावे त्याचबरोबर ज्या ठिकाणी अवश्यकता आहे त्या ठिकाणी नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात यावे यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा वार्षीक योजना २०२२-२३ अंतर्गत मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरूस्ती, नवीन स्वच्छतागृहाचे बांधकाम, स्वच्छतागृहाची दुरूस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, शाळा परिसरात पेव्हर ब्लॉक करणे, संरक्षण भिंत बांधणे, रंग काम करणे, पत्रे बदलणे, छत गळती थांबवणे, विद्युतीकरण करणे यासह विविध ६६ कामासाठी ४ कोटी ७५ लक्ष २४ हजार रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.
सदरील मंजूर कामातून माध्यमिक शाळा विशेष दुरूस्ती अंतर्गत जि.प.प्रशाला तांदूळजा स्वच्छतागृह दुरूसती ५.५ लक्ष, जि.प. प्रशाला रेणापूर इमारत दुरूस्ती ११ लक्ष, जि.प. प्रशाला पानगाव इमारत दुरूस्ती १० लक्ष, जि.प. प्रशाला भादा दोन स्वच्छतागृह ८ लक्ष रूपये तर प्राथमिक शाळा इमारत विशेष दुरूस्तीसाठी जि.प.रामेगाव पेव्हर ब्लॉक ४ लक्ष, जि. प. ताडकी इमारत दुरूस्ती ६ लक्ष, जि. प. टाकळगाव इमारत दुरूस्ती ६ लक्ष, जि. प. उमरगा इमारत दुरूस्ती ६ लक्ष, जि. प. सोनवती इमारत दुरूसती ११ लक्ष, जि. प. रेणापूर इमारत दुरूस्ती ९ लक्ष, जि. प. इंदरठाणा इमारत दुरूस्ती ३.५० लक्ष, जि. प. काळमाथा इमारत दुरूस्ती ६ लक्ष, जि. प. कवठा इमारत दुरूस्ती ४.५० लक्ष, जिप हळदुर्ग इमारत दुरूस्ती ७ लक्ष रूपये.
जिल्हा वार्षीक योजनेतून प्राथमिक शाळा विविध विकास कामासाठी जिप चिखुर्डा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप मांजरी नवीन तीन वर्गखोल्या २६.५० लक्ष, आखरवाई एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप बोपला दोन वर्गखोल्या १७.२९ लक्ष, जिप टाकळी शि. दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप टाकळी ब. एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप चिकलठाणा दोन वर्गखोल्या १७.२९ लक्ष, जिप चिकलठाणा दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप कोळपा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप सलगरा बु. दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप सलगरा बु. चार वार्गखोल्या ३२.८७ लक्ष, जिप हाकेतांडा एक वर्गखोली ९.५० लक्ष, जिप रामवाडी ख. एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप सेलू खु. दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप सेलू नवीन वस्ती एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप आनंदवाडी दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप आनंदवाडी दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप सेवादासनगर दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप यशवंतवाडी दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप आसराचीवाडी दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप रामवाडी पा. एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जि.प.पळशी दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप नागापूर दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप खानापूर एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप कामखेडा दोन वर्गखोली १७.२९ लक्ष, जिप बिटरगाव एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप हाकेतांडा दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप सुकणी एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप सत्तरधरवाडी एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप भेटा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप बोरगाव नं एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप अंदोरा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप उटी बु. एक वर्गखोली ९.५० लक्ष, जिप श्रीरामनगर संरक्षण भिंत ७ लक्ष रूपये आणि विशेष दुरूस्तीसाठी जिप वांजरखेडा ६.५० लक्ष, जिप सिंदाळा ७ लक्ष, जिप सय्यदपूर ३ लक्ष रूपये.
जिल्हा वार्षीक नियोजन अंतर्गत प्राथमिक शाळेत नवीन स्वच्छतागृह बांधकामासाठी जिप खुंटेफळ एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप सेलु बु. एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप खुलगापूर दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप कन्या मुरूड एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप मसला एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप प्राशा मुरूड एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप सारोळा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप बामणी दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप बिटरगाव तांडा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप पानगाव एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप फरदपूर तांडा एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप रेणापूर एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप सांगवी एक स्वच्छतागृह ४ लक्ष, जिप खरोळा दोन स्वच्छतागृह ८ लक्ष, जिप काळमाथा एक स्वच्छतागृह ४ लक्ष रूपये याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा