स्वामी विवेकानंद आयटीआय तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

 स्वामी विवेकानंद आयटीआय तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर





लातूर दि.07-04-2023
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजच्यावतीने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या शिबीराला आयटीआयच्या विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबीराच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे समन्वयक निळकंठराव पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समन्वयक विनोद जाधव, शासकीय आयटीआयचे प्राचार्य जाधव, स्वामी विवेकानंद आयटीआयचे प्राचार्य एस.एम.पांचाळ, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गोविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये स्वामी विवेकानंद आयटीआयच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्षातील सर्वच ट्रेडच्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ऑन द जॉब ट्रेनिंग यासह विविध कंपन्यामध्ये होणार्‍या कॅम्पस मुलाखती व न्यू एज कोर्सेसबद्दलही मार्गदर्शन मिळाले. यावेळी या मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीराला स्वामी विवेकानंद आयटीआयच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने