एमआयटीचा विद्यार्थी देवांग कुलकर्णी यांच्‍या संशोधनास इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडून मान्यता प्रदान

 एमआयटीचा विद्यार्थी देवांग कुलकर्णी यांच्‍या संशोधनास

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडून मान्यता प्रदान

 

लातूर  – येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. चतुर्थ वर्षातील विद्यार्थी देवांग कुलकर्णी याने शॉर्टटर्म स्टुडन्टशिप प्रोग्राम २०२२ (STS २०२२अंतर्गत कोरोना पश्चात रुग्णांना उच्च रक्तदाब’ या विषयावरील संशोधनास इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), न्यू दिल्ली यांनी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. या यशाबद्दल देवांग कुलकर्णी याचे एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्‍पा कराड यांनी सत्‍कार करून अभिनंदन केले. यावेळी शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळेऔषध वैद्यकशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. गजानन गोंधळीडॉ. यशपाल कांबळेडॉ. सचिन बाभळसुरे यांच्‍यासह अनेकजण होते.

लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी देवांग कुलकर्णी याने जानेवारी २०२२ मध्ये इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्‍याकडे संशोधनासाठी प्रस्ताव पाठवला होता. मे २०२२ मध्ये पाठवलेल्‍या प्रस्तावाची निवड होऊन संशोधनासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यानुसार कोरोना पश्चात रुग्णांना उच्च रक्तदाब’ या विषयावर देवांग कुलकर्णी याने आपले संशाधन पुर्ण करुन ते इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्‍याकडे सादर केले होते. दरम्यान शॉर्ट टर्म स्टुडन्टशिप प्रोग्राम २०२२ चा निकाल नुकताच घोषित झाला असून त्‍यात देवांग कुलकर्णी यांच्या संशोधनास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

 या संशोधन कार्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्‍याकडून देवांग कुलकर्णी यास  पन्‍नास हजार रूपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे. या संशोधन कार्यासाठी औषध वैद्यकशास्‍त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गजानन गोंधळी यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधन कार्यासाठी सबंध देशभरातील एम.बी.बी.एस. व बी.डी.एस. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून सादर केलेल्या संशोधनापैकी ११५९ संशोधन कार्यास मान्यता मिळालेली आहे. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातून अशा संशोधन कार्यासाठी मान्यता मिळवणारा देवांग कुलकर्णी हा दुसरा विद्यार्थी आहे.

देवांग कुलकर्णी याने केलेल्या संशोधन कार्यास इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यता प्रदान केल्याबद्द्ल त्याचे एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराडअधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादारउप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबाशैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळेप्रशासकीय व शैक्षणिक संचालीका डॉ. सरिता मंत्रीमार्गदर्शक डॉ. गजानन गोंधळीडॉ. अभिजीत रायते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने