भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात
संभाजी वायाळ यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश
लातूर - काँग्रेस कार्यकर्ते लातूर बाजार समितीचे माजी संचालक, भिसे वाघोली सोसायटीचे चेअरमन संभाजीराव वायाळ आणि सरपंच सौ. स्वयंम वायाळ यांच्यासह अनेकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या विजयात मोठी भर पडली आहे.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, भाजपाचे नेते राजेश कराड, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरे, उमेश बेद्रे, सुरज शिंदे, प्रताप पाटील, विश्वास कावळे, भैरवनाथ पिसाळ, काशिनाथ ढगे, शरद शिंदे, अरविंद सुरकुटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. वायाळ यांच्या भाजपा प्रवेशावेळी भिसे वाघोली आणि परीसरातील सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व इतर अनंकजण मोठ्या संख्येने होते.
बाजार समितीत रमेशअप्पा यांच्यामुळेच मला काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगून यावेळी बोलताना संभाजी वायाळ यांनी शेतक-यासाठी असलेल्या बाजार समितीच्या सभापतीपदी व्यापा-याची नियुक्ती केली. सात वर्षात कुठलेही शेतक-याच्या हिताचे निर्णय झाले नाहीत. येणा-या काळात शेतक-यांच्या हितासाठी त्याचबरोबर मतदार संघातील गावागावात विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने आणि त्यांच्या कामाला प्रेरीत होवून आम्ही आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलून दाखवले.
भारतीय जनता पार्टीत नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून आ. रमेशअप्पा कराड यांनी सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असे बोलून दाखविले. लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावत वाडी तांडयात आमदार निधी बरोबरच शासनाच्या विविध विभागामार्फत विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देता आला याचे समाधान असल्याचे सांगून लातूर ग्रामीणच्या आमदार महोदयाने कोणती कामे केली, कोणत्या गावात विकास निधी दिला असा प्रश्न उपस्थित केला. आजपर्यंत केवळ आडवणूकीची भुमिका घेवून सर्वसामान्य जनतेला देशमुखांनी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आ. कराड यांनी केला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भिसे वाघोली येथील चेअरमन संभाजीराव वायाळ, सरपंच स्वयम संभाजी वायाळ, अशोक पाटील, बाळासाहेब मांदळे, हमीद पठाण, शामराव जाडकर, लालासाहेब पाटील, अंकुश मनसुरे, शहाजी चौगुले, सय्यद हकीम, गोपीनाथ पाखरे, गुणवंत शिंदे, तुकाराम पानखेडे, सचिन मांदळे, सुधाकर वायाळ, जमील शेख, गोपाळ काळे, दिलीप भिसे, परमेश्वर शिंदे, श्रीनिवास वायाळ, संतोष भिसे, अण्णासाहेब चौगुले, विकास आडगळे, दादासाहेब वायाळ, बबन निलंगे, अशोक पानढवळे, शिवाजी निलंगे, सुभाष भिसे, राहुल भिसे, गोविंद पानखेडे, प्रदीप ढावारे, बालाजी निलंगे, शहाजी गायकवाड, अंकुश वानखेडे, आप्पासाहेब पाटील, रामेश्वर वायाळ, श्रीकृष्ण लकडे, राजाभाऊ भिसे, गणेश वानखेडे, समाधान पवार, नानासाहेब भिसे, श्रीकृष्ण लकडे, विजयकुमार वायाळ, सय्यद शमशोद्दीन, अशोक सावंत, आदेश वायाळ यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
टिप्पणी पोस्ट करा