मराठवाडा संगीत कला अकादमीच्या वतीने मोफत संगीत शिबीर उत्साहात संपन्न

 मराठवाडा संगीत कला अकादमीच्या वतीने मोफत संगीत शिबीर उत्साहात संपन्न



 लातूर :- येथील मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर आणि सरस्वती संगीत कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात संगीत कलेच्या प्रचार आणि प्रसारार्थ  सांस्कृतिक सभागृह, संगीत नगरी, बार्शी रोड, लातूर येथे मोफत संगीत शिबीर उत्साहात संपन्न झाले.या शिबीरास लातूर शहर व परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
   या मोफत संगीत  शिबिराचे उद्घाटन लातूर शहराचे पोलीस उपाधीक्षक श्री.जितेंद्र जगदाळे यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ,दीपप्रज्वलन करुन झाले.यावेळी संयोजक तालमणी प्राचार्य डाॅ.राम बोरगांवकर, सुरमणी पं.बाबुराव बोरगावकर, प्रा.गणेश बोरगावकर, श्री.विश्वेकर हे उपस्थित होते.
       याप्रसंगी बोलताना पोलीस उपाधीक्षक श्री.जितेंद्र जगदाळे म्हणाले की,अशा संगीत शिबीराच्या माध्यमातून उदयोन्मुख कलावंताच्या जडणघडणीत मोलाची मदत होते तसेच समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कला व संस्कृतीची जोपासना करणे अतिशय महत्वाचे आहे.असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
    याप्रसंगी प्रा.लक्ष्मण श्रीमंगले आणि मिनाक्षी भारती यांनी सुश्राव्य गायन केले तसेच श्रीमान सातपुते यांनी अतिशय बहारदारपणे सुगम गायन केले. त्यांना अतिशय तयारीने तबलासाथ लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी डाॅ.अरविंद लोखंडे यांनी दिली.
      या शिबीराप्रसंगी संगीत विषयातील तज्ज्ञ कलावंतांनी उपस्थित शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते विद्यार्थ्यांनी तितक्याच आत्मियतेने आत्मसात केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने