आ. धीरज देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त बाभळगाव महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न

 आ. धीरज देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त बाभळगाव महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न





बाबळगाव : दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगावचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दशरथ भिसे, डॉ.अंगद को, स्टाफ सचिव डॉ. जयदेवी पवार, डॉ.नरेंद्र देशमुख, डॉ.शाहूराज मुळे, डॉ. माना गायकवाड, प्रा. चंद्रकांत मोरे, डॉ. वैशाली माढेकर, डॉ. अजित भांजी, डॉ. कांतराव पोले, डॉ. सुरेशकुमार कांबळे, ग्रंथपाल डॉ.महावीर कटके, डॉ.अभिजीत बादाडे, प्रा. संतोष कल्याणकर, डॉ. नाना जाधव, बाळासाहेब देशमुख, वसंत मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी जाधव ओमकार, जाधव सुरवसे, आवटे स्वाती, आवटे ज्योती, साबणे प्रणिता, मोठेघर साक्षी, सय्यद सिमरन, बालाजी देशमुख, नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.
           कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने