ढोल - ताशे आणि टाळ मृदूंगाच्या गजरात औसा येथे वीर सावरकर गौरव यात्रा संपन्न झाली.!
औसा - महाराष्ट्राचे वीर सुपुत्र, थोर समाजसुधारक, तेजस्वी विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ, ढोल - ताशे आणि टाळ मृदूंगाच्या गजरात (दि.४) रोजी औसा शहरात उटगे मैदानापासून किल्ला मैदानापर्यंत वीर सावरकर गौरव यात्रा संपन्न झाली. शेकडो आबालवृद्धांनी या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. "अंदमानच्या काळकोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतमातेसाठी अन्वनित अत्याचार सहन केले, काँग्रेसकडून राजकारणासाठी त्यांचा वारंवार अपमान केला जाणं दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे" अस मनोगत समारोपप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी प्रा गणेश बेळंबे यांनी वीर सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासाची अनेक गूढ पाने उलगडून दाखविली.
या यात्रेत आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ सुनीलराव गायकवाड, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, भाजप प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, इतिहास अभ्यासक तथा वक्ते प्रा गणेश बेळंबे, औसा भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, सुनील उटगे, गणेश माडजे, बंडू कोद्रे, शहराध्यक्ष लहू कांबळे, प्रा सुधीर पोतदार, प्रवीण कोपरकर, संजय कुलकर्णी, दीपक चाबुकस्वार, कंठप्पा मुळे, अॅड अरविंद कुलकर्णी, सुशील दादा बाजपाई, माधवसिंग परिहार, कल्पना डांगे, सोनाली गुळबिले, जयश्री घोडके, सुवर्णाताई नाईक, धनराज परशने,समीर डेंग, गोपाळ धानूरे, श्रीराम माने, सचिन अनसारवाडे, तुराब देशमुख, प्रतीक पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा