कृषी विकास पॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीची वैभवशाली परंपरा कायम राखेल
लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांचे आशिर्वाद, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे नेतृत्व आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने अतिश्य पारदर्शक, लोकाभिमुख, गतीमानतेने काम केले आहे. त्यामुळे शेतक-यांसह सर्वच घटनांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. यापुढेही कृषी विकास पॅनल कृषी उत्पन्न बाजार समिची वैभवशाली परंपरा कायम राखेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कृषी विकास पॅनलचा ‘वचननामा’ आणि ‘जाहीरनामा’चे प्रकाशन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी बाजार समितीचे माजी संभापती ललितभाई शहा यांच्या आडत दुकानी झाले. त्याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अॅड. दीपक सुळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास को-ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांची उपस्थिती होती.महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका सुरु आहेत. त्यात लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अतिश्य महत्वाची आहे. लातूर शहराच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेली ही निवडणुक असून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही अपवाद वगळता विकासरत्न विलासराव देशमुख, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्याच विचाराने लातूर बाजार समिती कार्यरत राहिलेली आहे, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, यापुर्वी जो कालावधी विद्यमान संचालक मंडळाला मिळाला त्यात सभापती म्हणुन ललितभाई शहा व उपसभापती म्हणुन मनोज पाटील यांनी अतिश्य पारदर्शक, लोकाभिमुख, गतीमान आणि वैभवशाली काम केले आहे.ही वैभवशाली परंपरा पुढेही कायम राखली जाईल. आजपर्यंत केलेली कामे ‘वचनपुर्ती’ आणि भविष्यात करण्यात येणारी कामे ‘जाहीरनाम्या’च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कृषी विकास पॅनलने जे उमेदवार दिले आहेत., ते साधरणत: स्वत: मतदार आहेत. ज्यांच्याकडे ७/१२ आहे तेच उमेदवार असा कायदा केला असल्यामुळे आम्ही तसेच उमेदवार दिले आहेत. मतदारांपैकीच उमेदवार देण्याचा ९९ टक्के प्रयत्न केला आहे, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, कृषी विकास पॅनलचे उमेदवार हे स्वत:च्या गावासह पंचक्रोशीतील १० ते १२ गावांशी संपर्कात असलेले उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले.मार्केट यार्डमधील श्री गौरीशंकर मंदीरात महाआरती करुन कृषी विकास पॅनल लातूरच्या प्रचाराचा शुभारंभ
टिप्पणी पोस्ट करा