लिंगायत महासंघातर्फे महात्मा बसवेश्‍वरांची जयंती उत्साहात साजरी

लिंगायत महासंघातर्फे महात्मा बसवेश्‍वरांची जयंती उत्साहात साजरी

लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने लातूरातील महात्मा बसवेश्‍वर चौकात महात्मा बसवेश्‍वरांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार म्हणाले की, प्रत्येक मानवाचे कल्याण व्हावे असे महात्मा बसवेश्‍वरांचे विचार होते. बाराव्या शतकात वर्ग, वर्ण, लिंग, विरहीत समाजव्यवस्था निर्माण करून समतेचे राज्य आणले. उच्च, निच याला थारा दिला नाही. लोकशाहीचे जनक असलेल्या महात्मा बसवेश्‍वरांच्या विचाराचा आज जयंतीदिनी जागर होणे महत्वाचे आहे. सुरूवातीला महात्मा बसवेशवरांच्या आश्‍वरूढ पुतळ्याचे प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते पुष्पहाराने पुजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार सुधाकरराव श्रृंगारे म्हणाले की, महात्मा बसवेश्‍वरांनी 12 व्या शतकात समाजाला दिशा देण्याचे खुप मोठे काम केले आहे. आजच्या काळातही त्यांचे विचार आपणास मार्गदर्शक आहेत. यावेळी खासदार श्रृंगारे यांनी लिंगायत महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंतीचे कौतुक केले. याप्रसंगी नगरसेवक अजीत पाटील कव्हेकर, रागिनी यादव, शोभा पाटील, विजय धन्ना, लिंगायत महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष नागनाथप्पा भुरके, शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार, शहराध्यक्ष बलराज खंडोमलके, माणिकप्पा मरळे, रमेश वेरूळे, बस्वराज सुलगुडले, शिवदास लोहारे, जी.जी.ब्रम्हवाले या लिंगायत महासंघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह अ‍ॅड.व्यंकटराव बेद्रे, बसवंत उबाळे, प्रा.संगमेश्‍वर पानगावे, उमाकांत कोरे, उदय चौंडा, अ‍ॅड.मल्लिकार्जुन करडखेलकर, शरणप्पा अंबुलगे, मनोज मोठे, अ‍ॅड.अजय कलशेट्टी, विश्‍वनाथ खोबरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे अनेक कार्यकर्ते व असंख्य समाजबांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक उत्कृष्ट काम करणार्‍या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच लिंगायत महासंघाच्यावतीने प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते बसव रॅलीचे स्वागत करण्यात आले. लिंगायत महासंघत्तच्यावतीने दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माहत्मा बसवेश्‍वर बचत गटाच्यावतीने सहा महिलांना शिलाई मशीनचे वाटपही करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथप्पा भुरके, लिंगेश्‍वर बिरादार, बलराज खंडोमलके, प्रा.वैजनाथ मलशेट्टे, किशन कोलते आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशन कोलते यांनी केले तर आभार जी.जी.ब्रम्हवाले यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने