साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा विचार समाजाच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे -संजय गायकवाड

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा विचार समाजाच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे -संजय गायकवाड
देवणी /प्रतिनिधी - तालुक्यातील गुरधाळ खरबवाडी येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी आण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,लहुजी वस्ताद,यांच्या पुजन संजय गायकवाड म,प्रदेश संघटक सचिव सा,न्याय विभाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, वसंत बिबिनवरे उपेक्षिताचे नेते, पांडुरंग पटवारी चेअरमन,उध्दव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते,प्रा रतन सुर्यवंशी,सुरेखा जोगरे गुंजरगा सरपंच, अंकिता कांबळे,निकिता कांबळे, मुकेश कांबळे, नरसिंग गायकवाड सह संयोजक देवणी सा, न्याय विभागाचे कार्यध्यक्ष राष्ट्रवादीचे, सचिन मोगले, मा पत्रकार लक्ष्मण रणदिवे, शिवाजी सुर्यवंशी, बालाजी सोनकांबळे,दयानंद सोनकांबळे,रवि गुरधाळकर,यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,तसेच ध्वजारोहण पांडुरंग पटवारी,यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गायकवाड ,यावेळी प्रमुख उपस्थिती वसंत बिबिनवरे, प्रमुख व्याख्याते निकिता कांबळे,अंकिता कांबळे, प्रा रतन सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले
जयंती समिती अध्यक्ष मल्हारी गायकवाड, उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सचिव पांडुरंग गायकवाड, 
उषा गायकवाड, शाहू वाघमारे आशा कार्यकर्ती,नितिन गायकवाड,बाळु कांबळे,ज्ञानोबा गायकवाड,जोगिरे विजयकुमार, वाघमारे मदन आदिची उपस्थिती होती, तसेच शाळेतील विद्यार्थीही मनोगत व्यक्त केले होते, संजय गायकवाड यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकाळ खडतर जीवन व साहित्य लोकापर्यत पोहचवण्याचे काम केले आहे आजही फकिरा कांदबरी महाराष्ट्राला पहिला बहुमान साहित्याचा माध्यमातून मिळवले आहे अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पवाडे, लोकनाट्य हे कला जिवंत ठेवण्याचे काम फक्त आण्णाभाऊ साठे यांनीच करु शकले आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरा घरात अण्णाभाऊचा विचार पोहचला पाहिजे, सामाजिक चळवळीत सहभागी होण्यासाठी आरक्षण आपल्या हक्काचे असुन आपण त्या साठी रस्तावर उतरावे लागेल आणि आपल्या चार मागण्या मान्य करून घ्यावे लागले १ बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करणे, २ अ, ब, क, ड, वर्गीकरण करणे तसेच मातंग समाजाला १३℅ आरक्षण देण्यात यावे, ३ क्रांतिवीर लहुजी उस्ताद साळवे अभ्यास आयोगाची व ५९ शिफारशीची अमंलबजावणी करणे, हि मागण्या मुख्यमंत्री यांना जयंती निमित्त पत्र पाठवण्यात आले,व मार्गदर्शन केले व सुत्रसंचलन पत्रकार लक्ष्मण रणदिवे तर आभार रवि गुरधाळकर यांनी मांडले,भव्य दिव्य मिरवणूक सर्व पुरुष महिलांनी भाग घेतला होता जंयती  उत्साहात पार पडली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने