कु.श्रीजाने वाढदिवसानिमित्त डोळ्यांत टाकण्याचे ड्रॉप वाटप


कु.श्रीजाने वाढदिवसानिमित्त डोळ्यांत टाकण्याचे ड्रॉप वाटप

रेणापूर/प्रतिनिधी-तालुक्यातील रामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग अनिल येलगटे यांची कन्या कु.श्रीजाने वाढदिवसानिमित्त सामाजिक आपुलकी म्हणून सध्या राज्यात डोळ्याची साथ पसरलेली आहे. त्या अनुषंगाने सदरील साथीच्या संरक्षण करण्यासाठी आपला वाढदिवसानिमित्तने सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी येथे डोळ्यात टाकण्यासाठी पहिली ते पाचवी तसेच अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप चे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्र खरोळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धप्पाधुळे परमेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.धप्पाधुळे यांनी व
सध्याच्या साथीवर ड्रॉप कसे वापरायचे व साथी पासून कसे दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा, इतर व्यक्तींच्या रुमाल टावेल कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये, डोळ्यांना सतत स्पर्श करू नये, घराबाहेर जाताना गॉगल वापरा संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा असे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी रामवाडी गावचे सरपंच पांडुरंग कलुरे, उपसरपंच शिवकरण सुरवसे, सदस्य बाळू दिवटे, नरसिंग येलगटे, जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षिका लोंढे एम. आय., राजगुरू सी. आर. अंगणवाडी शिक्षिका दैवशाला बोंबडे तसेच रूपाली येलगटे, कस्तुराबाई सुरवसे, बेबा सुरवसे, सावित्रीबाई सुरवसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने