जिल्ह्यातील लातूर शहर निलंगा औसा शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

जिल्ह्यातील लातूर शहर निलंगा औसा शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
लातूर /प्रतिनिधी-शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, शंकरराव बोरगावकर  तसेच  उद्धव कदम हे लातूर शहर, निलंगा, औसा, शिरूर अनंतपाळ व देवणी या पाच तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी निलंगा विधानसभा संपर्कप्रमुख सुनील वेंगुर्लेकर व औसा विधानसभा संपर्कप्रमुख परुळेकर
 हे आहेत. तसेच होऊ द्या चर्चा गावोगावी या कार्यक्रमाचा आढावा घेऊन काही सूचना करणार आहेत. तरी वरील पाचही तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख लातूर शहरातील महानगर प्रमुख, महानगर संघटक, विधानसभा प्रमुख, विधानसभा समन्वयक संघटक, विधानसभा समन्वयक, शहर समन्वयक संघटक तसेच महिला आघाडी, व्यापारी आघाडी, युवासेना ,कामगार सेना, शिक्षक सेना, विधी आघाडी, ऑटो रिक्षा चालक सेना, विद्यार्थी वाहतूक सेना या सर्व अधिकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01=00 वाजता ओकिनावा शोरूम जवळ ॲड.श्रद्धा ताई जवळगेकर यांचे कार्यालय राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक जाणाऱ्या रिंग रोडवर युवती सेना जिल्हा अधिकारी ॲड‌.श्रद्धा ताई जवळगेकर यांच्या कार्यालयासमोर उपस्थित राहायचं आहे सदरील बैठकीसाठी येत असताना दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह लातूर येथे बैठकीमध्ये केलेल्या सूचनाचे नियोजन आपण केलेल्या पद्धतीने आप आपला अहवाल सोबत घेऊन यायचा आहे. तसेच केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी आपणाकडून केलेले नियोजन लेखी स्वरूपात द्यावयाचे आहे. यावेळी ॲड.श्रद्धाताई जवळगेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते नितीन नांदगावकर यांच्या हस्ते शंकरराव बोरगांवकर पक्षनिरीक्षक व 
उद्धव कदम शिवसेना पक्ष निरीक्षक तसेच देवेंद्र कांबळे
 व पिल्ले विधानसभा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये होणार असून आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने