सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी मोफत लातूर येथे ऑनलाईन/ ऑफलाइन सुरू
रेणा साखर कारखान्याचा पुढाकार
लातूर- शासकीय सेवेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही अनेक विद्यार्थी, तरुण, तरुणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करियर घडवीत असतात त्यांना सरकार महर्षी दिलीपरावजी देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयाचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने या केंद्रावरील विद्यार्थ्यांनी गतवर्षी विविध परीक्षेत यश संपादन केले आहे या यावर्षीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी. कम्बाईन व सरळसेवा ऑनलाईन व
ऑफलाईन लाईन बॅच सुरू झालेल्या असून 6 जुलै ला होणार्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरीता महत्त्वाचा 45 दिवसांचा क्रॅश कोर्स 13 मे पासून सुरु होणार आहे.
ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय आपल्या ग्रामीण भागातच उपलब्ध व्हावी याकरिता सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून रेणापुर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखाना. दिलीप नगर,निवाडा. व लातूर येथील सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय नि:शुल्क सुरू केलेले आहे. याचा विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी केले आहे
निवाडा नंतर आता लातुरात निःशुल्क स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू
विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आदरणीय श्रधेय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सूचनेनुसार या स्पर्धा परीक्षा केंद्राची दुसरी शाखा लातूर येथे श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय परिसरात उपलब्ध करुन दिली आहे तर कारखाना स्थळी निवाडा (दिलीपनगर) तालुका रेणापूर येथेही मार्गदर्शन केंद्र सुरू आहे यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.सुसज्ज लायब्ररी ऑफलाईन ऑनलाइन सुविधा उपलब्ध
एम.पी.एस.सी. राज्यसेवा पीएसआय एसटीआय/ एएसओ बँकिंग, सरळसेवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅचचे नियमित ऑनलाईन व ऑफलाइन लेक्चर्स, महाराष्ट्रातील विविध विषयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, सुसज्ज वातानुकूलित वर्ग, डिजिटल अभ्यासिका व सर्व पुस्तके, मासिके, मराठी, हिंदी, इंग्लिश वर्तमानपत्रे असणारे समृद्ध ग्रंथालय व व्यक्तिगत विकासावर भर व योग्य मार्गदर्शन या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत यश संपादन केले आहे. प्रत्येक बॅचसाठी दर आठ दिवसांनी ऑनलाइन + ऑफलाइन टेस्ट सिरीज व त्याचे विश्लेषण, उत्तम योजनेसहित प्रशस्त स्वतंत्र व सुरक्षित, उत्तम शैक्षणिक यशदायी वातावरण व आरामदायी बैठक व्यवस्था आहे अशी माहिती केंद्र समन्वयक प्रा. विनोद नवगिरे यांनी दिली.युपीएससी,एमपीएससी- राज्यसेवा, कम्बाईन परीक्षा 2024, बँकिंग व सरळ सेवा भरती कोर्स सुरू गरजूनी लाभ घ्यावा.( यु पी एस सी, एम पी एस सी परीक्षा 2024, बँकिंग व सरळसेवा मधील सर्व बॅचेसचे कोर्स नि:शुल्क ऑनलाईन + ऑफलाइन बॅच सकाळी 11 ते 6 या वेगवेगळ्या वेळेत सुरू होणार आहे तरी गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क करून मोफत शैक्षणीक उपक्रमाचा लाभ घ्यावा यासाठी खालील मोबाईल वर 9172161683/9175006567 संपर्क साधावा असे आवाहन रेणा साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा