'*विलास' कारखान्याला 'सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचा सत्कार

'विलास' कारखान्याला 'सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचा सत्कार

लातूर -सहकार आणि साखर उद्योगात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या वैशालीनगर, निवळी (लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्यास 'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे' (DSTA) यांच्या वतीने "सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - २०२६" हा मानाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
या सत्कार प्रसंगी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण आणि सदस्य गुरुनाथ गवळी, सौ. तनुजा चव्हाण, सौ. प्रिया उफाडे, सौ. पूजा जाधव, सौ. शिवानी शिंदे, सत्यनारायण पाटील, श्रीकांत बैले, विलास उफाडे, बाळासाहेब कदम, सौ. दिपाली कराड, अमोल देडे, सौ. सुनंदा स्वामी, सौ. पूजा ढगे,सौ शरयु गायकवाड,गणेश ढगे, अनिल कराड, जनक गायकवाड सर, भास्कर शिंदे, नितीन जाधव, बापूसाहेब चव्हाण, नामदेव उफाडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास कारखाना सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार तसेच माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कारखान्याला आजपर्यंत सहकार आणि साखर उद्योगाशी निगडित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तब्बल ३८ पुरस्कार मिळाले असून, या पुरस्काराने त्यात आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे. 
यावेळी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्कारा बद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने