लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारचा हरित उपक्रम; पिंपळे निलख येथे ७० वृक्षांचे रोपण१०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारचा हरित उपक्रम; पिंपळे निलख येथे ७० वृक्षांचे रोपण
१०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
पिंपरी चिंचवड : पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार आणि JSPM's Rajarshi Shahu College of Engineering, Tathawade, Pune यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळवण, पिंपळे निलख येथे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत परिसरात तब्बल ७० वृक्षांचे रोपण करण्यात आले. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमासाठी ७० वृक्ष उपलब्ध करून देण्यासाठी लायन रघुनाथ ढोले आणि लायन किशोर मोहोळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या पर्यावरणपूरक योगदानाबद्दल लायन्स क्लबच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी लायन अजय पैठणे सर, संस्थापक लायन प्रीती बोंडे आणि डॉ. बाबासाहेब गाडेकर सर यांनी पार पाडली. त्यांच्या नियोजनामुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग मिळाला.
या प्रसंगी संस्थापक लायन प्रीती बोंडे, प्रेसिडेंट लायन प्रज्ञा देवकाते, ट्रेजर लायन भक्ती बारहाते, सेक्रेटरी लायन वैशाली वाकचौरे, लायन जयंत बोंडे, लायन दादाराव फाटे आणि लायन नवनाथ वाघचौरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
वृक्षारोपण करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. केवळ वृक्षारोपण करून थांबणे नव्हे, तर लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित देखभाल करून त्याचे संगोपन करणे हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा एक भाग म्हणून आयोजित या उपक्रमामुळे पिंपळे निलख परिसरात हरित संवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला. सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांनी एकत्रितपणे पर्यावरणासाठी पुढाकार घेतल्यास पर्यावरण जागृती अधिक प्रभावीपणे निर्माण होऊ शकते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
“आज लावलेले एक रोप उद्याच्या पिढीला सावली, शुद्ध हवा आणि निरोगी पर्यावरण देऊ शकते. त्यामुळे वृक्षारोपण ही केवळ मोहीम नसून भविष्यासाठीची जबाबदारी आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने