केशरबाई भार्गव शाळेत डॉ. कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
लातूर :- भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा दिन सौ. केशरबाई भार्गव शाळेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने हरिती प्रकाशनचे प्रकाशक व वाचन चळवळ कार्यकर्ते श्री. राहुल लोंढे यांचे विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. यासोबतच पुस्तक व ग्रंथ प्रदर्शन, डॉ. कलाम यांचे चित्र रेखाटन, क्षेपणास्त्र प्रतिकृती तयार करणे, डॉ. कलाम यांच्या सुविचार पट्ट्या तयार करणे इत्यादी विविध उपक्रम
शाळेत आयोजित केले होते.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वरील उपक्रमात सहभागी होऊन डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. सहभागी विद्यार्थ्यांचे प्रकाशक राहुल लोंढे व शाळेचे मुख्याध्यापक भिमराव दुनगावे यांनी कौतुक केले. वरील उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सलगरे रुक्मिणी, फुले अंजना, भट्टड कल्पना, कावळे श्रीदेवी,मोरे सरिता, जमादार प्रियंका, अडाणे रेश्मा, सिरसाठे कांचन यांनी मार्गदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा